Published On : Thu, Jun 7th, 2018

मुखर्जी यांची हेडगेवार निवासस्थानाला भेट, सरसंघचालकांनी केले स्वागत

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप होणार असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कार्यक्रमाच्या अगोदर दुपारी 4.30 च्या सुमारास मुखर्जी यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली . यावेळी त्यांनी संघकार्याबाबत जाणून घेतले . सरसंघचालक डॉ.मोहन भागवत , अखिल भारतीय सह संपर्क प्रमूख सुनील देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले व या वास्तुबाबत माहिती दिली . महाल परिसरातील या निवासस्थानाचे संघात मोठे महत्त्व आहे . कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन करणार, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.