Published On : Wed, Mar 18th, 2020

विष्णु लक्ष्मी नगर कन्हान येथे स्वच्छता अभियान संपन्न

कन्हान : – नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे विष्णु लक्ष्मी नगर तारसा रोड येथे स्वच्छता अभियान राबऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या नगराध्यक्षा सौ करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष व स्वच्छता सभापती योगेंद्र रंगारी, विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे, नगरसेविका अनिता पाटिल आदी च्या प्रमुख उपस्थित विष्णु लक्ष्मी नगर प्रभाग क्र.२ येथील परिसराची स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.

याप्रसंगी स्वच्छता विभाग प्रमुख फिरोज बिसेन, प्रितम सोमकुवर, तालेवा र, कर्मचारी महेश बढेल, लकेश महातो, सामाजिक कार्यकर्ते नेवालाल पात्रे, शमशेर पुरवले, विजय खडसे, प्रविण गोडे, शैलेश दिवे, अमित भारद्वाज सहित विष्णुलक्ष्मी नगर चे नागरिक उपस्थित होते.