Published On : Tue, Aug 17th, 2021
By Nagpur Today Nagpur News

व्हर्चुअल पद्धतीने घरकुल सोडत सोहळ्याला लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (नामप्रविप्रा) बांधकाम केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत उर्वरित २९८० घरकुलांची सोडत आज सोमवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. आभासी प्रणालीच्या (व्हर्चुअल पद्धतीने) माध्यमाने यशस्वीरीत्या पार पडलेल्या या घरकुल सोडत सोहळ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांसाठी युसीएन केबल आणि यु-ट्यूब वर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते व्हर्चुअल पद्धतीने रिमोटची कळ दाबून सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार, खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या योजनेमार्फत सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. या योजनेत सोडत लागलेल्या सर्व विजेत्या लाभार्थ्यांना डॉ.राऊत, श्री.केदार तसेच श्री.तुमाने यांनी आभासी प्रमाणालीद्वारे शुभेच्छा दिल्या.
घरकुलांची वैशिष्ट्ये व घरकुल संदर्भात आवश्यक सर्व माहिती महानगर आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांना व लाभार्थ्यांना दिली. घरकुलांसाठी विजेते घोषित करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर मागणी पत्रकाप्रमाणे भरणा करून आवश्यक कागदपत्रे जमा करून घरकुलांचा ताबा यथाशिग्र घ्यावा असे आवाहनही यावेळी श्री. मनोजकुमार यांनी केले.
सोहळा संपन्न होताच लाभार्थ्यांची यादी युसीएन केबलवर (चॅनल ९१) प्रदर्शित करण्यात आली. व्हर्चुअल पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात घरकुल लाभलेल्या लाभार्थ्यांना आपली नावे https://pmay.nitnagpur.org या वेबसाईटवर पाहता येणार आहे. घरकुलांची रक्कम, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र… इत्यादी सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
एकूण ४३४५ घरकुलांपैकी उर्वरित २९८० घरकुलांसाठी आज सोडत काढण्यात आली. या २९८० घरकुलांमध्ये ख.क्र. ६३ मौजा तरोडी (खुर्द) येथील १७३७ घरकुले शिल्लक, ख.क्र. ६२ मौजा तरोडी (खुर्द) येथील ६६० आणि ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी येथील ५८३ घरकुलांचा समावेश आहे.
सदर स्थित नामप्रविप्रा’च्या सभागृहात महानगर आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी, खासदार कृपाल तुमाने, नासुप्रचे उप जिल्ह्याधिकारी श्री. अविनाश कातडे, नामप्रविप्रा’चे अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये आणि कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी मानले.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above