Published On : Mon, Jul 30th, 2018

उत्तर नागपुरातील विकास कामांना गती द्या : वीरेंद्र कुकरेजा

Advertisement

नागपूर : उत्तर नागपुरातील प्रस्तावित व प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. सोमवारी (ता.३०) स्थायी समिती सभापती यांनी उत्तर नागपुरातील प्रस्तावित व प्रलंबित कामांचा आढावा स्थायी समिती सभापती कक्षात घेतला.

यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक संजय चावरे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीत बोलताना स्थायी समिती सभापती श्री.कुकरेजा म्हणाले, उत्तर नागपुरातील सर्व प्रस्तावित कामांची प्रशासनिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. प्रलंबित असलेली कामे देखिल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

यावेळी उत्तर नागपुरातील डी.पी.रस्ते, सीमेंट रस्ते, कमाल चौक ते इंदोरा चौक, तथागत चौक ते कामठी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ते राणी दुर्गावती चौक, चंमार नाल्याची संरक्षक भिंत इत्यादी कामांच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. दयानंद पार्कच्या विकास कामाबाबतदेखिल स्थायी समिती सभापतींनी आढावा घेतला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement