इंफाळ : केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मणिपूरमधील कुकी बंडखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवान शाहिद झाले आहे. तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
माहितीनुसार,शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कुकी बंडखोरांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला केला.
या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला असून उपनिरीक्षक एन. सरकार आणि मुख्य शिपाई अरुप सैनी अशी मृतांची नावे आहेत.हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात होते.
या बंडखोरांनी काही दिवसांपूर्वीच कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ जिल्ह्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपालमध्येही दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या. याशिवाय इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेलमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews









