Published On : Sun, Apr 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

Advertisement

मुंबई :काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आले आहे.

महाविकास आघाडीतून उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली होती. त्यानंतर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या मतदारसंघातून अजून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. अखेर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आता महायुतीकडून कुणाला उमेदवारी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी घडल्या. चर्चेअंती काँग्रेसला मुंबईत दोन लोकसभेच्या जागा सोडण्याचा निर्णय झाला. पण यापैकी एका जागेवर ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा होती. विनोद घोसाळकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी

आग्रही असल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याची ऑफर दिली. यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मधल्या काळात वर्षा गायकवाड या नाराज असल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या नेत्यांनादेखील भेटल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या अनुपस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसची बैठक रद्द झाली होती. यानंतर आता वर्षा गायकवाड यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.