Published On : Fri, Jan 28th, 2022

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (२८ जानेवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल येथील नकक्षत्र बंकीत यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला.

त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत गंजीपेठ बजेरिया येथील पांडुरंग जगरे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला.

Advertisement
Advertisement

तसेच आशीनगर झोन अंतर्गत एच.बी.टाऊन विनोबाभावे नगर येथील हम लोग लॉन आणि पाटणकर चौक येथील गुज्जर लॉन यांच्याविरुद्ध लग्न समारंभात कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन २० हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement