Published On : Fri, Jan 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या राममनोहर लोहिया आणि संजयनगर शाळेत महापौरांच्या हस्ते ‘स्टेम लॅब’चे उदघाटन

Advertisement

नागपूर : मनपाच्या शाळेतील शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. यासाठी मनपाच्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे यासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात अली आहे. शुक्रवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा आणि संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेतील ‘अद्ययावत स्टेम लॅब’चे उदघाटन करण्यात आले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक मनोज चाफले, नगरसेविका सरिता कावरे, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, संजयनगर शाळेच्या इन्चार्ज ज्योती काकडे, पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे, पॉथ फाइंडर संस्थेचे राजेश मेश्राम, छाया पोटभरे, निकिता तपासे, तसेच दोनही शाळेचे मुख्याधापक आणि शिक्षक उपस्थित होते.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे यांनी प्रयोगशाळेविषयी आणि विविध प्रयोगांविषयी महापौरांना माहिती दिली व काही प्रात्यक्षिकही करून दाखविले.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी मनपातर्फे साकारण्यात आलेली ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. या लॅब आधुनिक भारतात अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

‘अद्ययावत स्टेम लॅब’च्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी प्रत्येक विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थी नैसर्गिक पद्धतीने आपल्या बुद्धीला विकसित करून खेळातून विज्ञानाला आत्मसात करू शकणार आहेत, असे महापौर यावेळी म्हणाले. स्टेम लॅबच्या निर्मितीसाठी नियमित पाठपुरावा करण्यासाठी महापौरांनी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे आणि शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार प्रवीण दटके यांचे आभार व्यक्त केले.

आ. प्रवीण दटके यांच्या निधीतून ७ लॅबची निर्मिती
मनपाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी कोणत्याही विषयात मागे राहू नये यासाठी मनपा सतत प्रयत्नशील असते. ज्येष्ठ नगरसेवक आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ७० लाखाच्या अनुदानातून मनपाच्या ७ शाळांमध्ये अद्ययावत प्रयोग लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत. या सर्व लॅब तयार झाल्या असून गुरुवारी तीन आणि शुक्रवारी दोन लॅबचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. उर्वरित दोन शाळांमधील लॅबचे सोमवारी महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.

लॅब तयार करण्यात आलेल्या शाळा

१. लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा

३. एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा

४. दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा

५. जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा

६. राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा

७. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा

या शाळांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना या लॅबमध्ये पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे मनपाचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमातील जवळपास २०० प्रयोग ते स्वतः करू शकणार आहेत. यावेळी शिक्षण समिती प्रमुख दिलीप दिवे यांनी आमदार प्रवीण दटके यांचे आभार मानले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement