Published On : Wed, Jan 19th, 2022

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (१९ जानेवारी) रोजी ९ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत बी.एस.एज्युकेशन द अप्टीटयुट स्कुल, फोरचुन मॉल, सिताबर्डी येथे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. तसेच नेहरुनगर झोन अंतर्गत आयडीयल कोचिंग इन्स्टीटयुट आशिर्वादनगर येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement

बुधवारी (ता.१९) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ येथील इंदुयश अपार्टमेंट, रामनगर चौक येथील बिर्यानी बाय किलो वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलीफोन एक्सेंच चौक येथील महेश किराणा स्टोअर्स आणि श्याम ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच आशीनगर झोन मधील कमाल बाजार येथील ताहुर गारमेंट आणि मनमोहन किराणा शॉप या दुकानांवर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement