Published On : Wed, Feb 16th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (१६ फेब्रुवारी) रोजी ०४ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. बुधवारी (ता.१५) धरमपेठ आणि झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.

पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत व्हेरायटी स्क्वेअर, सिताबर्डी येथील गेसन्स स्टॉल वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

त्याचप्रमाणे लकडगंज झोन मधील डिप्टी सिग्नल येथील राकेश साहु यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभुनगर येथील प्रमोद काकडे आणि गणेशपेठ येथील बिग बाजार यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.