Published On : Wed, Feb 16th, 2022
By Nagpur Today Nagpur News

विमुक्त, भटके आणि अर्धभटके समाजाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी योजना – SEED चा शुभारंभ

Advertisement

आज नवी दिल्ली येथे DNT (विमुक्त, भटक्या आणि अर्धभटका समाज) च्या आर्थिक सशक्तीकरणा ची योजना – SEED चा शुभारंभ झाला. हा एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. देशात प्रथमच, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदींच्या नेतृत्वात माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारमन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात DNT ( विमुक्त, भटके व अर्धभटका समुदाय) च्या आर्थिक सशक्तीकरणासाठी योजना – SEED (Scheme for Economic Empowerment of DNTs) चा समावेश केला आहे. या योजने चा शुभारंभ आज नवी दिल्ली च्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन मधे झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय वीरेन्द्र कुमार जी, राज्यमंत्री नारायण स्वामी जी, भटके-विमुक्त कल्याण बोर्ड चे अध्यक्ष श्रीमान दादासाहब इदाते, राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्त्योदय ते सर्वोदय चे स्वप्न साकार करण्याचा हा अतिशय सुंदर प्रयत्न आहे.

यावेळी राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले – ” मी केन्द्र सरकार चे अभिनंदन करतो आणि खूप धन्यवाद देऊ इच्छितो.

माझ्या धनगर समाज (शेफर्ड कम्युनिटी) चे अधिकतर लोक भटक्या विमुक्तांचं जीवन जगतात. त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना सुरू करण्यात मी योगदान देऊ शकलो याचे मला समाधान आहे. भटके-विमुक्त समुदायासाठी अशा प्रकारची योजना सुरू करावी असा प्रस्ताव घेऊन बजेट च्या आधी 22 डिसेंबर ला मी केंद्रीय अर्थमंत्री आदरणीय निर्मलाजी सीतारमन यांची भेट घेतली.

Advertisement

तसेच भटके-विमुक्त कल्याण बोर्ड चे अध्यक्ष श्रीमान दादासाहेब ईदाते यांच्या सोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय वीरेन्द्र कुमार यांची ही भेट घेतली. SEED योजनेच्या रूपातून आमच्या या विनंती चा मान राखला याबद्दल मोदी सरकार चे आभार.”

भटके-विमुक्त समाजात या योजनेमुळे उत्साहाचे वातावरण आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.