Published On : Wed, Sep 20th, 2017

टेकाडी गावातील मुलांनी केली गाव स्वच्छता.

Advertisement

कन्हान : पासुन जवळच असलेल्या टेकाडी गावातील मुलांनी नवरात्र, दशरा, दिवाळी सामोर असल्याने गावातील सार्वजनिक स्थळ, रस्त्याची स्वत: स्वच्छता करून ग्राम स्वच्छता अभियान स्वयंफुर्तपणे राबवुन आदर्श निर्माण केला.

पारशिवनी तालुक्यातील मोठ्या ग्राम पंचायतीतील एक महत्त्वाची म्हणुन टेकाडी (कोळसा खदान) ग्राम पंचायत असुन टेकाडी जुने गाव आहे. येथील प्रत्येक सण समस्थ गावकरी एकत्रित होऊन साजरा करतात. सध्या महत्वाचा महिना सुरू असून देखील सुध्दा गावात स्वछतेचा अभाव आहे. ग्राम पंचायत टेकाडी द्वारे वेळेवर सफाई होत नसल्याने सामोर नवरात्र, दशरा, दिवाळी असल्याने अस्वछता बघता टेकाडीतील मुलांनी स्वत:च परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली व टेकाडी गावातील मंदिर, रस्ते, चौक व सार्वजनिक स्थळे परिसर साफसफाई करून स्वच्छ केला.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ज्यात टेकाडीतील तरुण मुला पासून शाळेतील मुलांन पर्यंत सर्वांनी स्वयंफुर्तपणे सहभागी होऊन सहकार्य केले. यात मंगेश बोरघरे, ओम कडू , भारत कडू , अनिल कडू , अभिजित लंगडे, विकी सरनागते , रोहित मेहर , अतुल खेडकर ,शुभम मढई , मंथन घारड ,रजत खांदारे , शुभम सातपैसे, विशाल सारनागते, अवि वासाडे, ईशान भेलकर , सौरभ सहारे, हर्शल डाँगोरे, राजू कडू, दीपक कडू इतर टेकाडी ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement