Published On : Fri, Aug 3rd, 2018

‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’चे दिग्दर्शक विजय गुट्टेला अटक

Advertisement

मुबई : ‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’चे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना जीएसटी इंटेलिजेंस विंगने अटक केली आहे . त्यांना १३२(१)(सी ) जीएसटी कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे .

विजय यांच्यावर ३४ कोटी रुपयांच्या हेराफ़ेरीचा आरोप आहे . गुट्टे यांची कंपनी वीआरजी डिजिटल ने होरायजन नावाच्या कंपनीकडून एनीमेशन आणि कर्मचाऱ्यांना सर्विसच्या नावावर 266 कोटी रुपये दिले . यावर ३४ कोटीची कोटीची जीएसटी क्रेडिट बनावटी दस्तऐवज देऊन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जेव्हा की गुट्टे यांनी या कंपनीकडून कोणत्याच प्रकारची सर्विस घेतली नव्हती .

होरायजन कंपनीवर अगोदर पासूनच १७० कोटीच्या अवैध घोटाळ्यासंदर्भात जीएसटी बिल तयार करण्याचे प्रकरण सुरु आहे . ही कंपनी अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करून बनावट जीएसटी बिल देऊन कोट्यावधीचा घोटाळा करते. दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे हे महारष्ट्राचे राजकीय नेता रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा आहे . धक्कादायक बाब म्हणजे विजय गुट्टे यांच्यावर 5500 कोटीच्या बँक घोटाळ्याचा आरोपही आहे .

दिग्दर्शक म्हणून विजय गुट्टे ‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ नावाच्या चित्रपटाची निर्माती करीत आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे .