Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कोळसा घोटाळा प्रकरणात विजय दर्डा यांना दिलासा; ईडीचे मनी लॉन्डरिंग प्रकरणही न्यायालयाने काढले निकाली

Advertisement

नवी दिल्ली : बहुचर्चित बंदर (Bandar) कोळसा ब्लॉक वाटप प्रकरणात माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, उद्योगपती मनोज कुमार जयसवाल आणि इतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यातील (PMLA) प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले.

यापूर्वी 27 मार्च 2026 रोजी विशेष CBI न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मूळ गुन्ह्यातच (Scheduled Offence) आरोपी निर्दोष ठरल्याने त्यावर आधारित ईडीचे मनी लॉन्डरिंग प्रकरण चालू ठेवण्याचा आधार उरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ईडीने आरोप केला होता की, उद्योगपती मनोज जयसवाल यांच्याशी संबंधित कंपन्यांकडून विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांच्याशी संबंधित कंपनीकडे सुमारे 24.6 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला होता. हा व्यवहार कोळसा ब्लॉक वाटपातील कथित गैरव्यवहारातून झाल्याचा दावा ईडीने केला होता.

मात्र, तब्बल 11 वर्षे चाललेल्या खटल्यानंतर CBI न्यायालयाने या आरोपांना ठोस पुरावे नसल्याचे नमूद करत विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज जयसवाल, एएमआर आयर्न अँड स्टील प्रा. लि. तसेच तत्कालीन कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘विजय मदनलाल चौधरी विरुद्ध भारत सरकार’ या निर्णयाचा आधार घेत बचाव पक्षाने PMLA अंतर्गत कारवाई टिकू शकत नसल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने ईडीचे प्रकरणही निकाली काढले.

यामुळे बंदर कोळसा ब्लॉक वाटपाशी संबंधित CBI आणि ईडी या दोन्ही प्रकरणांत विजय दर्डा आणि इतर आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.