Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शहरातील सर्व क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष, सचिवांशी महापौर, आयुक्तांनी केली क्रीडा विकासाविषयी चर्चा

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील २०० खेळाच्या मैदानांच्या सर्वांगीण विकास केला जाणार असून, नागरिकांना सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडा मैदाने उपलब्ध व्हावी, यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सोमवारी(ता.१३) विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.

यावेळी शहरातील मैदानांचा विकास संबंधित क्रीडा संघटनांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार करण्याचा मानस महापौरांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते तथा विशेष समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, माजी आमदार श्री. संदीप जोशी, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, श्री. रितेश गावंडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, कार्यकारी अभियंता श्री. सुनील गजभिये, वृक्षसंवर्धन समितीचे श्री. अमोल चौरपगार, क्रीडा निरीक्षक श्रीमती उज्वला चरडे, तसेच विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीत मैदानांच्या विकासासाठी आवश्यक नियोजन, अंदाजपत्रक, विविध खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरातील विद्यमान खेळाच्या मैदानांचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करून मुला-मुलींसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इंडोर आणि आऊटडोअर खेळांच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा विकसित करण्यात येतील. प्रत्येक मैदानाची क्षमता, उपलब्ध जागा आणि संबंधित झोनचा विचार करून त्या मैदानावर कोणत्या खेळासाठी सुविधा विकसित करता येतील, याबाबत क्रीडा संघटनांनी आपल्या सूचना सादर कराव्यात, असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार श्री. संदीप जोशी यांनी क्रीडा मैदाने तयार करण्यासह मनपाने क्रीडा धोराण सुनिश्चित करण्याची सूचना केली. तसेच सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी नागरिकांसाठी क्रीडा मैदाने विकसित करताना सर्वसहमतीने निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर आयुक्त डॉ. विपीन यांनी मैदान विकसित करताना बहुउद्देशीय स्वरूपात क्रीडा मैदान विकसित करणचा विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी कुस्ती, बास्केटबॉल, तायक्वांदो, एथलेटिक्स आर्चरी, सायकलिंग, पिकलबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, जलतरण, बॉक्सिंग, आट्यापाट्या आदी विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी मैदानांमध्ये उच्च दर्जाची प्रकाश व्यवस्था, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल स्क्रीन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच एकाच मैदानात तीन ते चार खेळ खेळता येतील, अशा बहुउद्देशीय स्वरूपात मैदानांचा विकास करण्यात येणार यावे, आदी सूचना केल्या.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.