Published On : Fri, May 1st, 2020

विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

नागपूर :- महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना या संघटनेने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिनी विभागीय कार्यालय नागपूर येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ लाखाचा धनादेश विभागीय आयुक्त संजीव कुमार तसेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. धनादेशासोबत दिलेल्या पत्रात संघटना आकस्मिक गंभीर परिस्थितीत रक्तदान व आपत्ती मदत सहाय्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

तसेच कोरोना संकटावर मात करतांना विज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्या अत्यंत महत्वाच्या समस्यांबाबत ऊर्जामंत्री यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात सरचिटणीस मधुकर सुरवाडे, उपाध्यक्ष रमेश गोरकर, राहुल बेले, अलोक सोनेकर, नंदकिशोर काकडे उपस्थित होते.