Published On : Wed, Oct 2nd, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात म. गांधी यांची 150 वी जयंती साजरी.”

Advertisement

रामटेक : राष्ट्रपिता म. गांधी यांची 150 वी जयंती तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने विद्यासागर कला महाविद्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पिल्लई यांनी म. गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी आपल्या मार्गदर्शन पर विचारातून आजच्या काळाला म.गांधी यांच्या विचारांची खरी गरज असल्याचे सांगितले. रासेयो अधिकारी डॉ. गिरीश सपाटे यांनी प्रास्ताविक केले. कु. स्नेहल खेडीकर, कु. राणी गजभिये, कु. प्रियंका बोरकर या विद्यार्थ्यांनी म. गांधी यांच्या विषयी माहितीपर विचार व्यक्त केले. प्राचार्य. डॉ. पिल्लई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म.गांधी यांचे विचार सर्वांनी कृतीत आणले पाहिजे असे सांगितले.

महाविद्यालय ते ग्रामपंचायत खैरी बिजेवड पर्यंत विद्यार्थ्यांची भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविविध बॅनर पोस्टर आणि स्वच्छता अभियानवर फलके हातात घेऊन नारे देत देत ग्रामपंचायत खैरी बिजेवड पर्यन्त रॅली काढली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.खुडसाव उपसरपंच बडवाईक, सदस्य नितीन बंडीवार तसेच सदस्य व ग्रामवासी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सर्व रासेयो स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता केली. या प्रसंगी प्राचार्य. डॉ पिल्लई, प्रा. अनिल दाणी, प्रा. रवींद्र पानतावणे ,डॉ. ज्योती कवठे, जितेंद्र बदनाग, युनुस पठाण, रफिक कुरेशी, नाना हटवार, विनोद परतीती, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु.प्रीती माहुरकर हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकानी प्रयत्न केले.