Published On : Wed, Oct 2nd, 2019

साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे

कन्हान : कन्हान पासुन 7कि मि अंतरावर श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती व ‘जय जवान जय किसान’ हा नारा देशाला देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्याने येसबा गावातील गांधी स्मारका नजीकचा परिसर स्वच्छ करून ,गांधीजी च्या पूतड्या ला पुष्पहार अर्पण करून गावातील लोकांना तसेच महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना *’प्लॅस्टिक मुक्त महाविद्यालयात व परीसर’* हा उपक्रम घेण्यात येवून कार्यकारी प्राचार्य सौ सुप्रिया राजेश पेंढारी यांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली.

महाविद्यालयीन परीसरातील प्लॅस्टिक गोळा करून ग्रामपंचायतकडे जमा करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित येसबा ग्राम.पंचायत सरपंच श्री .धनराजजी हरोडे,श्री कुमार गडे (गांधी स्मारक समिती सचिव) श्री .विठ्ठललराव महल्ले माजी पोलिसपाटिल येसबा ,श्री पंकज चाकोले ग्राम.सदस्य येसबा,भारतीताई वाघमारे ग्राम. सदस्य , फुलचंद्र इरपाते (शिक्षण समिती सभापती येसबा)श्री.कार्तिक भोयर शिक्षण समिती उपसभापती येसबा)श्री भगवतराव महल्ले माजी ग्रा.सदस्य ,महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.ऋषीकेश गोरे यांनी मार्गदर्शन केले.

संचालन प्रा.रवींद्र ठोरे यांनी केले.आभार प्रा.कु.पल्लवी ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाला प्रा.सौ.सारिका सूर्यवंशी,श्री रामेश्वर नागपुरे,श्री नितिन कारेमोरे,श्री पंकज वांढरे,श्री खुशाल शेंडे,श्री.डीमु महल्ले इत्यादी उपस्थित होते.

प्रातिनिधी कमल यादव