Published On : Mon, Nov 25th, 2019

विकास प्राथमिक शाळा कन्हान येथे आनंद मेळावा साजरा

कन्हान : – विकास प्राथमिक शाळा कन्हान येथे विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे दुकान लावुन मनसोक्त स्वाद घेत आंनद मेळावा साजरा करण्यात आला.

आंनद मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेन्द्र खंडाईत, उदघाटन ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका बलीराम दखने हाइस्कूल कन्हान विशाखा ठमके,गौतमी गजभिये, त्रिशुल गवली आदीने विद्यार्थ्यां च्या विविध खाद्य पदार्थाचे दुकानाचे निरिक्षण करित स्वाद घेत उत्कुष्ट विद्यार्थ्यांची निवड केली.

तद्नंतर विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे मनसोक्त स्वाद घेत व्यावहारिक शिक्षण आत्मसात करित आंनद मेळावा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत बोन्द्रे यांनी तर आभार विजय तिमांडे यांनी केले.

यशस्वीते करिता श्रीरंग बोरकर, सौ सुनंदा बारई, देवेन्द्र सेंगर, शरद डोकरीमारे, विजय तिमांडे, ज्योती गोड़े, अभिलाषा कावडे, योगिता भनारकर आदीने सहकार्य केले.