नागपूर : शहरात नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. अशा स्थितीत काही अनुचित घटना घडू नये, यासाठी नागपूर पोलिसांचा शहरात खडा पहारा राहणार आहे. शहरातील विविध भागात ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहील,अशी माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील महत्त्वाच्या परिसरात नाकाबंदी – नववर्षाच्या उत्सवापूर्वी नागपूर पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून शहरभर नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी शहारत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम-
नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. भरधाव वाहने चालवून अपघात घडवितात.
अशा प्रसंगी सर्व सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर्षी पोलिसांनी मद्यपींवर विशेष लक्ष ठेऊन आहे. मद्यपींसाठी पोलिसांकडून ड्रन्क अँड ड्राईव्ह मोहीम राबविली जाणार आहे. ब्रिथ ॲनेलायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जे मद्यप्राशन करून गोंधळ घालतील, अशांना कारागृहाची हवा खाली लागणार असल्याची इशारा सीपी सिंगल यांनी दिला.