नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वेडा हरी परिसरात खरसोली रोडवरील जबलपूर महामार्गाजवळ प्लास्टिकच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी समोर आली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तत्पूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फायटर प्लेन पडल्याचे एक जण सांगताना ऐकायला येत आहे. मात्र ती केवळ अफवा असल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोल्ड कॉईन हॉटेलच्या बाजूला असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाजवळ ही आग लागली. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा जाळला होता. त्यातून उडालेल्या ठिणग्या जवळच असलेल्या प्लास्टिकच्या गोदामात पडल्याने आग भडकली असल्याचे सांगितले जात आहे.
प्लास्टिक साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळातच धुराचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असून प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





