Published On : Wed, Apr 14th, 2021

Video : खापरखेड़ा जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करा – महासंघची मागणी


खापरखेडा :- चिचोली (खापरखेडा) ग्राम पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक मध्ये असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात स्थानिक रहिवाश्यांनी अनेक वर्षापासून अवैध कब्जा करीत अतिक्रमण केल्याचे प्रकरण उघड़ झाले आहे . याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते यांनी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि चिचोली (खापरखेडा) ग्राम पंचायतचे ग्रामसेवक विजय लंगड़े यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तिवर फौजदारी गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे .

सविस्तर वृत असे की चिचोली (खापरखेडा) ग्राम पंचायतच्या चिचोली वार्ड क्रमांक एक मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात स्थानिक तीन चार कुटुंबियानी अवैध कब्जा करून शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे . त्यांची घरे हे जिल्हा परिषद शाळेला लागुनच असल्याने त्यांनी शाळा परिसरात सरळ प्रवेश करता येईल आणि जागेचा वापर करता येईल अश्या पद्दतिने शाळेच्या दिशेने बांधकाम करीत आपल्या घराचे मागील दरवाजे उघडे केले. त्यातील काही व्यक्तिनी त्या जागेचा वाड़ी, फुलझाड़े , दैनिक कामकाज व चुली साठी वापर सुरु केला , तर काहिनी तिथे स्वताचे चारचाकी व दुचाकी वाहने ठेवण्यासाठी त्या जागेचा वापर सुरु केला , त्यासाठी शेड सुद्धा लावण्यात आले आहे.


शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा दोषी
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून स्थानिक लोकं अवैध कब्जा करून अतिक्रमण करीत असल्याची बाब शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नजरेत न येणे ,ही खुपच संशयास्पद गोष्ट आहे. नाव उघड़ न करण्याच्या अटिवर काही स्थानिक नागरिकांकड माहिती प्राप्त झाली की शाळेचे मुख्याध्यापक यांना हा सर्व प्रकार माहित असून परिसरात वाहने ठेवण्यासाठी शाळेची जागा व गेटचा वापर करण्यास त्यांनीच सहमति दिलेली आहे . त्यांनी स्वताच शाळेच्या गेटची चाबी सुद्धा त्या व्यक्तीना दिलेली आहे . शासकीय शाळेच्या परिसरात अश्याप्रकारे अवैध कब्जा करून जागेचा वापर करने हे कृत्य बेकायदेशिर असून कार्यवाहिस पात्र आहे . यात त्या मुख्याध्यापकाचा सुद्धा सहभाग असल्यास त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही अपेक्षित आहे, अशी कोलते यांनी मांहिती दिली.

लवकरच कार्यवाही होईल…
चिचोली (खापरखेडा) ग्राम पंचायत चे ग्रामसेवक विजय लंगड़े ने सांगितले कि शाळा परिसरात अवैध कब्जा व अतिक्रमण विषयी तक्रारी ग्राम पंचायतला प्राप्त झाल्या असल्याने ग्राम पंचायतच्या मासिक सभेत याविषयी ठराव घेण्यात आला आहे. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीना नोटिस देण्यात येईल. याविषयी कार्यवाहिची प्रक्रिया सुरु आहे. नोटिस दिल्यावरही अतिक्रमण न काढल्यास संबंधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल आणि अतिक्रमण विषयी कलम 54 नुसार ते अतिक्रमण पूर्णता काढण्यात येईल .