नागपूर, १४ मे २०२५ – विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (VTPA) आणि जीएसटी बार असोसिएशन (GSTBA) यांच्या संयुक्त विद्यमाने “चॅरिटेबल ट्रस्ट्स – प्रात्याक्षिक प्रकरणे आणि अडचणी” या विषयावर एक माहितीपूर्ण सत्र SGST भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आले.
सत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबईचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व “Charitable Trusts – Cutting Through the Complexity” या पुस्तकाचे लेखक सीए प्रेमल गांधी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट्ससंबंधी गेल्या काही वर्षांतील सुधारित कायद्यांमुळे उद्भवणाऱ्या अनेक अडचणींवर सखोल आणि प्रात्याक्षिक स्वरूपात प्रकाश टाकला.
त्यांनी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती दिली:
- नोंदणी नसलेल्या ट्रस्टवर लागू होणाऱ्या कर दरांचा परिणाम
- ट्रस्ट नोंदणीतील तांत्रिक अडचणी
- आयकर कायद्यातील नवी सुधारणा – धारा 12AB अंतर्गत नोंदणीची वैधता आता ५ ऐवजी १० वर्षे
- Form 9A, 10, 10B, 10BB आणि ऑडिट रिपोर्टशी संबंधित तांत्रिक बाबी
या कार्यक्रमाचे समन्वयन व आयोजन सीए नरेश जाखोटिया, सचिव VTPA यांनी अतिशय उत्तम रीतीने केले. कार्यक्रमात अनेक कर सल्लागार, वकील व ट्रस्ट प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आणि प्रश्नोत्तर सत्रात उत्साहाने भाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए महेंद्र जैन, अध्यक्ष VTPA व डॉ. दीपक पांडे, अध्यक्ष GSTBA होते. समारोप सीए रमेश चौधरी यांनी आभार प्रदर्शनाने केला.