Published On : Wed, Dec 5th, 2018

विदर्भ शाहीर कलाकार परिषद

Advertisement

कन्हान : – विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे दिव्यांगाचा सत्कार व फळ, बिस्कीट वितरण करून आंतर राष्ट्रीय दिव्यांग (अपंग) दिवस साजरा करण्यात आला .

पांधन रोड कन्हान येथील विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या कार्यालयात केंद्रीय अध्यक्ष श्री धर्मदास भिवगडे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, ऋृषभ बावनकर यांच्या उपस्थित अंनता भोस्कर, वनिता मेश्राम, प्रविण शेंडे, सुभाष मेश्राम, रवी पाल, योगेश पात्रे , अंकुश कुमार, रंगराव ठाकरे , मिलींद बेलेकर या दिव्यांगाना (अपंगांना) पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देत फळ व बिस्कीट वितरण करण्यात आले .

Gold Rate
27 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी मान्यवरांनी विविध शासकीय योजनाच्या माहीती विषयी मार्गदर्शन करून आंतर राष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजु राऊत यांनी तर आभार अश्विनी भिवगडे यांनी व्यकत केले .

Advertisement
Advertisement