Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘एडवांटेज विदर्भ’मुळे जागतिक नकाशावर विदर्भ; 42 हजार कोटींच्या करारांनी महोत्सवाचा समारोप!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
Advertisement

नागपूर– विदर्भातील औद्योगिक संधी जगासमोर मांडणाऱ्या तिसऱ्या एडवांटेज विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सवाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले. अवघ्या तीन दिवसांत 42 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार, 23 देशांतील राजनैतिक प्रतिनिधींची उपस्थिती आणि आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्राचा मोठा सहभाग यामुळे विदर्भाला जागतिक व्यासपीठ मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर विद्यापीठ परिसरात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

विदर्भासाठी सेक्टरनिहाय विकासाचा रोडमॅप-
महोत्सवाच्या माध्यमातून 25 तांत्रिक चर्चासत्रे, 250 तज्ज्ञ मार्गदर्शक, साडेपाच हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाल्याची माहिती देत गडकरी यांनी, “आता विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी 25 ठराविक सेक्टर निश्चित करून लक्ष्यित कामकाज आवश्यक आहे,” असे स्पष्ट केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) चे स्वतंत्र संकुल मे महिन्यात सुरू होणार असून, या माध्यमातून वर्षभर उद्योगविषयक उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

नागपूरकरांसाठी आधुनिक वाहतूक व ऊर्जा सुविधा
नागपूर शहरात फ्लॅश चार्जिंगवर आधारित 135 नवीन इलेक्ट्रिक बसेस लवकरच दाखल होणार असून,पुढील तीन वर्षांत पाइपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली.

एमएसएमई देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा – शोभा करंदलाजे
केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी,
“AID मुळे विदर्भातील उद्योगविश्वाला नवी दिशा मिळाली आहे,” असे सांगत,
देशभरात 33 कोटींपेक्षा अधिक उद्योजकांनी एमएसएमई पोर्टलवर नोंदणी केली असून,
भारताच्या निर्यातीत एमएसएमईचा वाटा 45 टक्के असल्याचे अधोरेखित केले.
कौशल्य विकास, सोपी सबसिडी, तसेच ब्रँडिंग व मार्केटिंग सुधारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुंतवणुकीबरोबरच नवकल्पनांना चालना-
AID चे अध्यक्ष आशिष काळे यांनी सांगितले की,
महोत्सवाच्या कालावधीत 42 हजार कोटी रुपयांचे करार निश्चित झाले,
तर 22 विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कल्पनांना 5.5 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
“पुढील वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केला जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

गडचिरोलीचे विद्यार्थी थेट ऑस्ट्रेलियात-
गडचिरोली जिल्ह्यातील 18 विद्यार्थी मायनिंग आणि मेटलर्जी अभियांत्रिकी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात जाणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना प्रवासासाठी बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. हा उपक्रम लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

करार, सन्मान आणि गुंतवणूक-
• लर्न कोच आणि AID अंतर्गत लर्निंग स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
• सुनील फेरो अँड इंजिनिअरिंग प्रा. लि. कडून विदर्भात 5,000 कोटींची गुंतवणूक, सुमारे 1,500 रोजगार
• आरोह हॉस्पिटॅलिटी – महिंद्रा सिग्नेचर यांच्यात फाईव्ह स्टार रिसॉर्टसाठी करार-
• ग्रेटा एनर्जी लिमिटेड (2,000 कोटी) व VIPL (1,200 कोटी) गुंतवणुकीबद्दल विशेष सन्मान

पुरस्कार वितरण-
• बेस्ट स्टॉल पुरस्कार – महा मेट्रो
• उत्कृष्ट एमएसएमई उद्योजक व संस्थांचा गौरव

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.