Published On : Sun, Mar 25th, 2018

विहिंप नेते तोगडियांचे पुन्हा पंतप्रधान मोदींवर थेट शरसंधान; म्हणाले, आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी

नागपूर: विहिंप नेते तोगडियांचे पुन्हा पंतप्रधान मोदींवर थेट शरसंधान साधले आहे. राम मंदिरासह अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याची सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसह काश्मिरात हिंदू पंडितांचे पुनर्वसन, बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि लाखो युवकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी देणाऱ्या मोदी सरकारकडून चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही,

या शब्दात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर नागपुरातून तोफ डागली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर संसदेत कायदा संमत करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणीही तोगडिया यांनी केली.