Published On : Sat, Jan 15th, 2022

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर पोस्ट केला एक व्हीडिओ

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर नुकताच एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या भावुक व्हीडिओत म्हणतात, “मी एका छोट्याशा शहरातून येतो. इथं आईचा पदर कुठकुठल्या कामांसाठी वापरला जातो ते बघुया. डोळ्यातले अश्रु पुसायला आईचा पदर वापरला जात असे.

मात्र जेवल्यावर तोंड पुसायला आईचा पदर वापरण्याचीही मजा काही वेगळीच असायची. कधी डोळा दुखत असे तेव्हा आई आपल्या साडीच्या पदराचा बोळा करून तो फुंकर घालत उबदार बनवायची. मग त्याला डोळ्यावर ठेवताक्षणीच दुखणं कुठल्याकुठे पळून जायचं. कुठे बाहेर जायचं असल्यास, आईचा पदर धरला की गुगल मॅपचीही गरज नसायची. हा पदर म्हणजे जणू सगळं विश्व मुठीत आलेलं असायचं.

Advertisement

अनेकदा झाडावरून पडणारी फळं झेलण्यासाठीही हा पदर वापरला जायचा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा पदर गारवा द्यायचा. पदराला गाठ मारून आई चालती-फिरती बॅंकच सोबत ठेवायची. तुमचं नशीब चांगलं असेल तर त्यातले काही पैसे तुम्हाला मिळायचेही.आईच्या पदराची जागा कधीच कुठली गोष्ट घेऊ शकत नाही. कारण हा पदर म्हणजे खरोखर एक जादुई गोष्ट आहे. चला आता यानिमित्तानं आपल्या आईला फोन करा.”

Check this post from @anupampkher on Koo App:

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement