Published On : Tue, Apr 16th, 2019

बंद टोल नाक्यावर वाहतुक पोलीसां ची वाहन तपासणी की वसुली ?

महामार्ग वाहतुक पोलीसांची एकही मोठी कार्यवाही नाही .

कन्हान : नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कँम्प टेेकाडी व्दारे दररोज छोटय़ा मोठय़ा वाहनाची वाहतुक पोलीस तपासणी करतात परंतु आता पर्यंत एकही मोठी कार्यवाही करण्यात आली नसल्याने महामार्ग बंद टोल नाक्यावर वाहतुक पोलीसांची वाहन तपासणी की वसुली ? असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे .

काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ (जुना महामार्ग क्र ७) वरील वराडा व टेकाडी मध्यंतरी बंद टोल नाक्यावर महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कँम्प (टेेकाडी) वाहतुक पोलीस केंद्र सुरू आहे. दररोज सकाळी ये-जा करण्या-या वाहनाची तपासणी करण्यात येते. याच महामार्गा वरून जनावराच्या, ओव्हरलोड, अवैध कोळशा, रेती, माती, मँग्नीज दगड चोरी, लाकडाचे ट्रक, मध्य प्रदेशातुन दारू ची वाहतुक होत असते .


याच बंद टोल नाक्यावर व जवळपास कन्हान, नागपुर वाहतुक पोलीस सुध्दा वाहनाची तपास णी करतात. बाहेरच्या वाहनाना व छोटय़ा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. तो जर वाहन तपासणी करिता असतो तर मागील दोन वर्षा पासुन अवैधरीत्या वाहतुक करण्या-या वाहने पकडण्यात का आली नाही.

जेव्हा की थोडया सामोर असण्या-या कांद्री टोल जवळुन नागपुर, कामठी पोलीसांनी अवैधरीत्या मँग्नीज दगड, रेती, जनावरांची वाहतुक करणारे वाहने पकडुन कार्यवाही करण्यात आली आहे . यास्तव आतापर्यंत एकही मोठी कार्यवाही करण्यात आली नसल्याने महामार्ग बंद टोल नाक्यावर वाहतुक पोलीसांची वाहन तपासणी की वसुली ? असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे.