Published On : Mon, Jun 17th, 2019

वृक्षारोपण,वृक्षसंवर्धनाच्या संकल्पाने महिलांनी केले वडसावित्री पुजन

कन्हान : – परिसरातील महिलांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या संकल्पाने महिलांनी थाटात आधुनिक वडसावित्री पुजन केले.

कन्हान, कांद्रीला सकाळ पासुन महिलांची वडसावित्री पुजनाची रेलचेल दिसत होती. शहरातील प्रत्येक वडाच्या झाडा भोवती महिलांची गर्दी होती. संताजी नगर कान्द्री येथील भुमिपुत्र महिला मंडळाच्या वतीने भविष्या दुष्टीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करून “पर्यावरणाची सुरक्षाच सुखी, समृध्द जिवनाची तिजोरी आहे” या संदेशा सह वडसावित्री पुजन थाटात साजरे केले.

याप्रसंगी कांद्री ग्रा.प. सदस्या अरुणाताई हजारे, वंदनाताई गड़े, राखी गभने, रूपाली हजारे, अर्चना कुल्लरकर, लता बावनकुळे, नेहा सिरसागर, मीरा कुंभलकर, पल्लवी शर्मा, ममता चटप, रीता शेन्द्रे, शोभा मंगर, वंशिका झलके, आशा गुरव, प्रिती लंगडे कन्हान च्या पुष्पा कुंभलकर, त्रिवेणी सरोदे, मिना कुंभलकर, भाग्यश्री कुर्जेकर, पुजा कुंभलकर, बिल्लु घारपिंडे सह मोठय़ा संख्येने महिलांनी सहभागी होऊन आधुनिक वडसावित्री पुजन केले