Published On : Sat, Jan 18th, 2020

भाजयुमो तर्फे संजय राऊतांचा तीव्र निषेध

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या वंशजांबद्दल काढलेले वक्तव्याबद्दल नागपूर भाजयुमो ने खासदार संजय राऊत ह्यांच्या प्रतिमेला बुटांचा हार घालून काळिमा फसत नागपूर भाजयुमोने व्यक्तव्याचा निषेध केला. यावेळी भाजयुमो शहर अध्यक्षा शिवानीताई दाणी वखरे यांनी या वक्तव्यावर निषेध वक्त करत बोलतांना सत्तेसाठी अतिशय खालच्या पातळीवर जाण्याचे काम शिवसेना आणि त्यांचे खा.संजय राऊत यांनी केलेलं आहे.

हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत असं दिसतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीवर बाबत जे वक्तव्य राऊतांनी केलं होतं ते केवळ सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी वक्तव्य मागे घेतलं पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या गादीचा अपमान करण्याचे काम असं अतिशय भ्याड कृत्य राऊत यांनी केले आहे. राऊतांनी स्वतःळची पात्रता या कृत्यामुळे दाखवलेली आहे.

सत्तेसाठी शिवसेना अजून किती लाचार होऊ शकते हे त्यांना आपल्या वक्तव्यातून दाखविले आहे. नक्कीच ही वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना नाही असे आज दुर्दैवाने म्हणावे लागते आणि असे वक्तव्य केल्यावर देखील शिवसेनेनं आपल्या खासदारावर कारवाही केलेली नाही त्यामुळे शिवसेनेचा देखील निषेध यावेळी व्यक्त केला व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाची माफी मागावी आणि माफी न मागितल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मागणी यावेळी केली.

ह्यावेळी भाजयुमोच्या नागपूर शहराध्यक्ष शिवानी दाणी, महामंत्री जितू ठाकूर,राहुल खंगार,मंडळ अध्यक्ष दिपाशु लिंगायत,आलोक पांडे,कमलेश पांडे, सचिन करारे,महामंत्री सचिन सावरकर,आशिष चिटणणीस,शैलेश शुक्ला, नागपूर शहर संपर्क प्रमुख नेहल खानोरकर, गुड्डू पांडे, रितेश राहाटे, सागर गंधर्व, संकेत कुकडे,अथर्व त्रिवेदी,प्रकाश मालवीय,अक्षय ठवकर,सजवानी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.