Published On : Sat, Jan 18th, 2020

कॉग्रेसच्या सौ मिना कावळे सभापती तर चेतन देशमुख उपसभापती

कन्हान : – पंचायत समिती पारशिवनी च्या आठ गणाच्या निवडणुकीत कॉग्रेस ०६ , शिवसेना ०१ व भाजप ०१ सदस्य निवडुन आल्याने कॉग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने सभापती सौ मिना कावळे तर उपसभापती चेतन देशमुख यांची बिनवि रोध निवड करण्यात आली.

शुक्रवार (दि.१७) ला दुपारी सभाप ती व उपसभापती पदाची निवडणुक घे ण्यात आली. यात कॉग्रेस पक्षाचे माहु ली गणातुन १) चेतन शंकर देशमुख २) करंभाड गण- संदीप कंठाजी भलावी ३) नयाकुंड गण – मंगला उमराव निबोंणे ४) गोंडेगाव गण – निकिता सिताराम भारव्दाज ५) टेकाडी (को. ख) गण – करूणा टोलुराम भोवते ६) कांद्री गण- मिना प्रफुल कावळे शिवसेनेचे १) चारगाव गणातुन किसन सिताराम घंगारे, भाजपचे बनपुरी गणातुन – १) नरेश अखाडु मेश्राम निवडुन आल्याने कॉग्रेस ०६, शिवसेना ०१ व भाजप ०१ सदस्य संख्या असल्या ने कॉग्रेस पक्षाचे बहुमतानी सभापती सौ मिना कावळे तर उपसभापती चेतन देश मुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कॉग्रेसचे मा मंत्री सुनिल बाबु केदार यांचे सभापती व उपसभापती झाल्याने कॉग्रेसचे दयाराम भोयर, बबन राव झाडे, राजकुमार कुंसुबे, श्यामकुमार बर्वे, देवाजी शेळकी, सिताराम भारव्दाज , प्रमोद कावळे, धंनजय सिंह, पप्पु गुप्ता, गणेश सरोदे, प्रफुल कावळे, प्रविण सेला रे, सचिन सोमकुवर सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यानी गुलाल उधळुन हर्षोउल्हास साजरा केला.