Published On : Mon, Aug 9th, 2021

वाडीनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कार्यप्रणाली विरोधात शिवसेना देखील नाराज

– कार्यप्रणालीत सुधारणा न झाल्यास बदली-आंदोलन

वाडी– वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या कार्यप्रणाली विरोधात बसपा,प्रहार च्या नाराजी नंतर आता शिवसेने ने ही उडी घेतली असून मुख्याधिकारी यांची कार्यप्रणाली लोकाभिमुख नसून निष्क्रिय व एकतर्फी असल्याचा आरोप करून त्यांच्या बदलीची मागणी वाडी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.

हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे,नागपूर तहसील प्रमुख संजय अनासने सह युवा सेनेचे पदाधिकारी विजय मिश्रा,अखिल पोहनकर,यांनी एक निवेदन व चर्चेतून सांगितले की मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षितेमुळे वाडी परिसरात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.नप मध्ये जन सभागृह जरी अस्तित्वात नसले तरी नागरिक राजकीय पक्ष व माजी नगरसेवकाना समस्या सांगतात.न प कडे जेव्हा अशा समस्या प्रस्तुत करण्यात येतात त्यावर मुद्तीत कार्यवाही होताना दिसत नाही.तसेच मुख्याधिकारी यांनी ही कधी वाडी जनहीत समस्या समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी वा माजी नगरसेवकांची बैठक घेऊन स्थिती समजून घेतली नाही.बहुतेक कर्मचारी ही सकारात्मक सहकार्य व मार्गदर्शन करीत नाही.

आरोग्यासाठी दवाखाना,स्वछता, पाणी समस्या ,डम्पिंग यार्ड,खड्डे युक्त रस्ते,निकृष्ठ रस्त्याचे बांधकाम,मोकाट जनावरे, नाली सफाई , बेहाल बागा , या सोबत आर.एल मंजरी साठी नप ने निश्चित शुल्क निर्धारित केले नाही.एक विशिष्ट व्यक्ती जे शुल्क सांगेल ते गरजू ना दयावे लागते.व त्या व्यक्तीच्या च मंजुरी ने डिमांड कशी निघते?घर टॅक्स,व फेरफार, घर मंजुरी प्रक्रिया अत्यन्त किचकट करून ठेवली आहे ही बाब मुख्याधिकाऱ्यांना माहीत असूनही कार्यवाही करून नागरिकांना दिलासा नाही.कर भरल्याशिवाय गरजू ना ना हरकत प्रमाणपत्र न देणे इ.बाबी नि नागरिक त्रस्त झाले आहे.

नुकतेच अमित तायडे प्रकरणात तर कर्मचाऱयांनी वाडीतील जनसमस्या घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळणा निवेदन न्यावे की नेऊ नये या समभ्रमात पाडले. कर्मचारी पदाला न्याय देत नाही व शासकीय कामात अडथळा या कायद्याचा दुरुपयोग करतात व मुख्याधिकारी पक्षपात करतात.एकूणच मुख्याधिकारी यांनी कार्यप्रनालीत त्वरित बदल न केल्यास त्यांच्या बदली साठी शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देऊन ही बाब खासदार कृपाल तुमाणे व राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आणून देण्याचे सांगितले.या पत्रकार परिषदेत शिव सेना -युवा सेना-वाहतूक सेने चे राकेश अग्रवाल, दामू जोध,सचिन बोंबले,रोशन पोहनकर,देवेश ठाकरे,सतपाल सिंग,मोहित कोठे,पिंटू पोहनकर,देवेश ठाकरे,इ.उपस्थित होते.