Published On : Wed, Jun 2nd, 2021

डिक दवाखाना येथे लसीकरण सुरु

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले शुभारंभ

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या डिक दवाखाना धरमपेठ येथे लसीकरण केन्द्राचा शुभारंभ महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रोटरी क्लब – नागपूर ईशान्य या लसीकरण केन्द्राच्या संचालनात नागपूर महानगरपालिकेला मदत करणार आहे.

Advertisement

रोटरी क्लब च्या माध्यमाने येथे लसीकरणासाठी येणा-या नागरिकांसाठी एक भव्य मंडप उभारण्यात आला असून विविध आवश्यक सूविधा ही येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी येथे लसीकरण होणार आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून येथे शनिवारी आणि रविवारी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी केन्द्रांमध्ये नेण्या-आणण्याची नि:शुल्क व्यवस्थासुध्दा करण्यात आलेली आहे. यासाठी एक रुग्णवाहिका रोटरी क्लब व्दारे ठेवण्यात आली आहे.

Advertisement

यावेळी महापौर समवेत वैद्यकीय आरोग्य व सेवा समिती सभापती श्री.महेश माहाजन, धरमपेठ झोनचे सभापती श्री. सुनील हिरणवार, अति.आयुक्त श्री. राम जोशी, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय बंगाले, नगरसेविका श्रीमती उज्वला शर्मा, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शब्बीर शाकीर, डिस्ट्रीक्ट सचिव टॉबी भगवाघर, ए.जी.मिनल देहाडराय, रोटरी ईशान्य चे अध्यक्ष श्री. योगेश टावरी, सचिव नरेश बलदवा, मनोज महेश्वरी, रवि अग्रवाल, ब्रिज किशोर सारडा, निलेश गांधी, गोविंद सारडा, संजय अग्रवाल, अनिल परवरकर, दिनेश राठी, नविन लांजेवार, संजय राठी यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व झोनचे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व केन्द्रावर काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement