Advertisement
नागपूर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षाची ताकद वाढवणयासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हे पाहता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने (BJYM) व्ही.एन. रेड्डी यांची सोशल मीडिया समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रेड्डी यांच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यांच्याकडून प्रेरित झालेले असंख्य तरुण कार्यकर्ते ते बीजेवायएमसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. याबाबत भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी हे नियुक्तीपत्र जारी केले असून, उपमुख्यमंत्री फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने रेड्डी हे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
रेड्डी यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो, असेभारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी म्हटले.