Advertisement
नागपूर: कळमनातील भारत वाडा येथे तिरुपती किराणा दुकानावर तीन राउंड गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सनी शाहू असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून हेमचंद शाहू हे या दुकानाचे मालक आहेत.
माहितीनूसार,काही दिवसांपूर्वी आरोपी सनी शाहू याने भरतवाडा टी पॉइंट येथील तिरुपती किराणा दुकान मालकाला जिवंत काडतुसे दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ही बाब गांभीर्याने घेत दुकान मालकाने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी गेल्या आठ दिवसांपासून फरार होता.
आज दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान पुन्हा आरोपीने सदर दुकानात येऊन दोन ते तीन राउंड फायारींग केले. सुदौवाने यात कोणालाही जीवितहानी झाली नाही.कळमना पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास सुरू केला आहे.