Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Sat, Mar 17th, 2018

उषा व राशी कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांना विचारणा करू – मुख्यमंत्री


नागपुर: बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यासाठीआपण व्यक्तिगत त्यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिले.

महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, नरेश डोंगरे, अविनाश महाजन आणिया दुहेरी हत्याकांड चे पीड़ित पत्रकार रविकांत कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नागपुरात 17 फेब्रुवारीला घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाची व आतापर्यंतच्या घडामोडींची माहिती पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या घटनेमुळेकेवळ नागपूरच नव्हे तर राज्यभरात थरार निर्माण केला आहे. आरोपींनी चौपन्न वर्षीय उषा कांबळे यांच्यासोबतच दीढ़ वर्षीय चिमुकली राशि कांबळे हिची देखीलनिर्घुण हत्या केली आणि या दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशीमागणी नागरिकांमधून पुढे आली आहे या हत्याकांडाच्या संबंधाने निर्माण झालेली जनभावना पत्रकारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एडवोकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच या दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावाअशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकमयांची नियुक्ती करण्यासंदर्भात आपण पूर्ण प्रयत्न करू मी स्वतः एडवोकेट उज्वल निकम यांच्याशी चर्चा करणार असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचेप्रयत्न करू असे ते म्हणाले. पत्रकारांनी या प्रकरणात एका तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला त्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखलघेतली अधिकाऱ्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावरही कड़क कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Trending In Nagpur
Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145