Published On : Tue, Mar 31st, 2020

अनावश्यक विजेचा वापर टाळावा

Advertisement

अतिरिक्त दाबामुळे रोहित्रात होऊ शकतो बिघाड महावितरणचे ग्राहकांना आवाहन

Mahavitaran Logo Marathi
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लाॅकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र इतर सर्व वर्गवारीच्या ग्राहकांचा वीज वापर या काळात अल्प झाला असला तरी घरगुती वापराच्या विजेमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून रोहित्रात बिघाड होऊन नादुरुस्त होवू शकते तरी अनावश्यक वीज वापर टाळण्याचे आवाहन ग्राहकांना महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोव्हीड-१९ या विषाणूच्या संकट काळातही महावितरण अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. त्यामुळे सर्व शहरी व ग्रामीण भागातील घरगुती वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, संचारबंदीच्या या काळात सर्वजण घरी असल्याने आपली सर्व भिस्त वीज उपकरणावर राहणार आहे. असे असले तरी गरज असलेल्या विद्युत वापर करण्यास काही हरकत नाही, मात्र अनावश्यक वापर टाळला पाहिजे यामध्ये शेगडी, हीटर, एसी यासारखी अतिदाबाची विद्युत उपकरणे वापरु नये. त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून आपल्या भागातील रोहित्रात बिघाड होऊन नादुरुस्त होवू शकते.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकाचवेळी सर्वत्र वापर वाढल्यास रोहित्र नादुस्त होण्याची संख्या सुद्धा वाढू शकते. सध्या देशात लाॅकडाऊन करण्यात आले असल्याने सदर रोहित्र दुरुस्तीचे करताना मर्यादा असल्याने खासगी युनिट मध्ये सुद्धा कर्मचारी व साहित्याची वानवा भासू शकते, असल्याने ट्रांसफार्मर मिळण्यास विलंब होऊ शकतो. तसेच रोहित्राची वाहतूक करताना सुद्धा विलंब होऊ शकतो. याचप्रमाणे कृषी पंप ग्राहकांनी सुद्धा मंजूर क्षमतेच्या मोटरी वापराव्या, तसेच कृषी वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे अथवा हुक टाकणार नाही याची ग्राहकांनी सुद्धा दक्षता घावी जेणेकरून दाब वाढून रोहित्रात बिघाड वा नादुरुस्त होणार नाही. असे झाल्यास त्याला सुद्धा दुरुस्तीला वा वाहतुकीला या काळात विलंब लागू शकतो.

तरी सर्व वीज ग्राहकांना विनंती तथा आवाहन करण्यात येते की, आपला विद्युत वापर गरजेनुसार व रोहित्राच्या क्षमतेनुसार करावा जेणेकरून सुरळीत वीज पुरवठा राहण्यास मदत होईल असे आवाहन महावितरणने केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement