Published On : Mon, Feb 26th, 2018

यूएस कॉन्सल जनरलची मनपाला भेट

Advertisement


नागपूर: पश्चिम भारताचे यूएस कॉन्सल जनरल एडगर्ड डी. कागन आणि गेटकेचे क्रान्तेझेन यांनी सोमवारी (ता. २६) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. या भेटीत त्यांनी महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल आणि स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशनचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांच्याकडून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. नागपूर शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांना दोन्ही बाजूंच्या सहकार्याने कशी गती देता येईल, याची शक्यता पडताळण्याकरिता त्यांनी ही भेट दिली.

महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी यावेळी यूएस कॉन्सल जनरल यांना स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्प, क्षेत्राधिष्ठित शाश्वत विकास (Area Based Development), सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प (STP), रोड नेटवर्क प्रोजेक्ट आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना आदी नागपुरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. पूर्ण झालेले आणि सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली.

यूएस कॉन्सल जनरल एडगर्ड डी. कागन हे नागपुरात सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती जाणून प्रभावित झाले. याबद्दल महाराष्ट्र शासन आणि स्थानिक नेत्यांचे अभिनंदन केले. नागपुरात सुरू असलेल्या विकास कार्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देत असलेल्या योगदानाचा विशेषत्वाने त्यांनी उल्लेख केला.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे, नगरसेवक विरेंद्र कुकरेजा आणि उपअभियंता राजेश दुफारे यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement