पुणे:केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल अखेर जाहीर झाला असून, देशभरातील हजारो उमेदवारांमध्ये पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरी रँक मिळवत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. देशातून पहिली रँक प्रयागराजच्या शक्ती दुबे हिला मिळाली असून, दुसरी रँक हर्शिता गोयलने मिळवली आहे. अर्चितने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याचे नाव उज्वल केले आहे.
अर्चितच्या या घवघवत्या यशामुळे त्याच्या परिवारात आनंदाचे वातावरण आहे. त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
यंदाची यूपीएससी परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये पार पडली होती, तर त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जानेवारीमध्ये घेण्यात आली होती. यंदा एकूण १००९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २४१ जणांची अंतिम यादीत निवड झाली आहे.
या यादीत आणखी काही उल्लेखनीय नावं म्हणजे, शाह मार्गी चिराग (४ थी रँक), आकाश गर्ग (५ वी), कोमल पुनिया (६ वी), आयुषी बन्सल (७ वी), राज कृष्णा झा (८ वी), आदित्य विक्रम अग्रवाल (९ वी) आणि मयंक त्रिपाठी (१० वी).
प्रशासकीय सेवेत प्रवेश घेणे हा अनेक तरुणांचा स्वप्न असतो. त्यासाठी ते अपार मेहनत घेतात. या सर्व गुणवंत उमेदवारांनीही आपापल्या परीने मेहनत करत हे यश प्राप्त केले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आता लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) येथे आयएएस प्रशिक्षणासाठी, तर आयपीएस उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे.
या सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!