Published On : Sun, Sep 29th, 2019

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केली ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची पाहणी,

Advertisement

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षात्मक दृष्टिकोनातून प्रशासनिक आढावा

कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येतील अनुयायी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यास भेट देणारे अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात याच पाश्वरभूमीवर यावर्षीसुद्धा 4 लाख पेक्षा अधिक अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणार असल्याने नागपूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी काल विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत परिसराची पाहणी केली तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र व विपश्यना केंद्रची सुद्धा पाहणी केली .यानंतर अनुयायांच्या सुरक्षात्मक दृष्टिकोन तसेच परिसरात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.

याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय कदम यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मूलभूत नागरी सुविधा , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफ सफाई ची व्यवस्था , रस्ते दुरुस्ती , प्रकाश व्यवस्था, पार्किंग तसेच कायदा व सुव्यवस्था उपलब्ध करून देण्यासह ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला बस ने प्रवास करणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील मार्गच्या दुरावस्थेत सुव्यवस्था करीत वाहतूक सुरळीत करण्याची उपस्थित प्रशासनिक अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, एसडीओ श्याम मंदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता अश्विन चव्हाण, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, तसेच बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर, नियाज अहमद, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, दीपक सीरिया, अश्फाक कुरेशी, मुश्ताक अली, अफजल भाई, सुशील तायडे, दीपक डांगे, प्रवीण नगरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी