Published On : Tue, Mar 3rd, 2020

केबल संदर्भातील सूचना सादर करण्यास सात दिवसांची मुदतवाढ

Advertisement

नागपूर: विद्युत खांबांवरून टाकण्यात आलेल्या केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणाला छेद दिला जात आहे. केबल सुरळीत करण्यासाठी धोरण निश्चीत करण्यात येणार आहे.

यासाठी शहरातील सर्व केबल ऑपरेटर्सची बैठक घेण्यात आली होती. सर्व ऑपरेटर्सकडून धोरण निश्चीतीसाठी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. शहराच्या हिताच्या दृष्टीने धोरण निश्चीतीसाठी केबल एजन्सी व ऑपरेटर्सच्या सूचना महत्वाच्या ठरणार असल्याने त्यांच्या सूचनांसाठी पुन्हा सात दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्युत खांबांवरील केबल संदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील उपमहापौर कक्षामध्ये समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये समितीच्या अध्यक्ष उपमहापौर मनीषा कोठे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ॲड. संजय बालपांडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

विद्युत खांब व अन्य ठिकाणाहून संपूर्ण शहरात बेशिस्तपणे केबल टाकण्यात आले आहेत. यामुळे खांबांवर केबल्सचे जाळे तयार झाले आहे. ‘द केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) ॲक्ट १९९५’ कायद्यानुसार केबल धोरण निश्चीत केले जाणार आहे. शहरातील नागरिक व केबल व्यावसायिक या सर्वांच्याच हिताचे धोरण निश्चीत करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे.

यासाठी सर्व केबल ऑपरेटर्स आणि केबल एजन्सींकडून सूचना मागविण्यात आल्या आहे. पुढील सात दिवसात सर्व केबल व्यावसायिकांनी आपल्या सूचना मनपाकडे सादर करण्याचे आवाहन समिती सभापती उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले आहे.

येत्या सात दिवसांमध्ये सूचना न आल्यास प्रशासनाद्वारे पुढील कार्यवाही करण्याचेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement