Published On : Thu, Nov 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लोकनेते स्व. दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण; विविध विकासकामांचे लोकार्पण

डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
Advertisement

लोकनेते स्व. दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण; विविध विकासकामांचे लोकार्पण

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते स्व. दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण तसेच विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी पार पडले.

यावेळी नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय, शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालय आणि स्व. दत्ताजी मेघे स्मृती दालनाचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. दत्ताजी मेघे यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने दर्जेदार कृषी शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पशुसंवर्धन आणि आधुनिक उपचारपद्धतींमुळे शेतकरी व पशुपालकांना लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर मेघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

प्रतिनिधी अजय मेहरकुळे रामटेक

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.