नवी दिल्ली:इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (EVM) साठवलेली माहिती तूर्तास नष्ट करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पडताळणी संदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, सध्या तरी ईव्हीएममधील कोणताही डेटा डिलीट करू नका किंवा त्यात कोणताही नवीन डेटा,असे म्हटले. ईव्हीएमची जळालेली मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर ची पडताळणी व्यावसायिक अभियंत्याकडून करून ईव्हीएममध्ये (EVM) छेडछाड झाली नसल्याचे सत्यापित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), हरयाणा काँग्रेसचे नेते सर्व मित्तर आणि करणसिंग दलाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईव्हीएमची मूळ जळलेली मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी धोरण आखण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवडणूक निकालावरील शंका आणि ईव्हीएम छेडछाडीच्या शंकांची पडताळणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.