Published On : Thu, May 9th, 2024

नागपुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित !

Advertisement

नागपूर : हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार आज नागपुरात सकाळी ९ वाजतपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

शहरात अनेक भागातील झाडे उन्मळून पडली, होर्डिंग फाटले, विजेचे तार तुटले व टीनही उडाले. या पावसामुळे आठवडाभर नागरिक उन्हाने होरपळल्यानंतर आज वातावरणात गारवा निर्माण झाला. आज सकाळी ९ वाजतापासून वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.पावसासह आलेले सोसाट्याचे वादळ इतके वेगात होते की त्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. नागपूर शहरात सिव्हिल लाईन्स व गंजीपेठ येथे झाडे कोसळली. अनेक ठिकाणी झोपड्यांच्या छतावरील टीन उडल्याच्याही घटना घडल्या. होर्डिंगवरचे टीन व कपड्याचे बॅनरही फाटून हवेत उडाले, ज्यामुळे विजेची तारे तुटल्याने काही भागातील विज पुरवठा बंद पडला. उत्तर व पूर्व नागपुरात रस्त्यावर पाणी साचल्याने पाहायला मिळाले. त्यामुळे नागपूरकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.