लातूर : मे महिन्यातील वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या लातूरकरांना अखेर मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र रात्री अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. तरीही उकाड्यापासून मिळालेल्या दिलास्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हवामान विभागाने यापूर्वीच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार बीड आणि जालना जिल्ह्यांत दुपारपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मात्र लातूर जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा तडाखा कायम असल्याने नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने शहरासह परिसरातील वातावरण आल्हाददायक झाले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





