कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका अविवाहित तरुणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील छताच्या लोखंडी हुकला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कमलेश अरुण पाटील वय 35 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा घरी एकटाच असून घरात कुणीही नसल्याची संधी साधून दिवसाढवळ्या आज दुपारी 3 वाजता गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरिय तपासणीसाठी शवविच्छेदनार्थ कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पश्चात आई व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.