Published On : Fri, Mar 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची मान्यवरांकडे सदिच्छा भेट

Advertisement

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घरी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले.

जनसंपर्क अभियानांतर्गत ज्येष्ठ नेते श्री. दत्ताजी मेघे, ज्येष्ठ विधीज्ञ श्री. व्ही. आर. मनोहर, देशाचे माजी सरन्यायाधीश श्री. शरद बोबडे, राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालक श्रीमती प्रमिलाताई मेढे, दै. नवभारतचे एडिटर-इन-चीफ श्री. विनोद माहेश्वरी, ज्येष्ठ संपादक श्री. लक्ष्मणराव जोशी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. विकास सिरपूरकर, माजी महापौर श्रीमती कुंदाताई विजयकर, प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रभाकरराव मुंडले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक श्री. राजेश लोया,

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू श्री. योगानंद काळे, श्री. अरविंद खांडेकर, श्रीमती राजश्री जिचकार, श्री. कमलेश समर्थ यांच्या निवासस्थानी ना. श्री. नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी मान्यवरांसह त्यांच्या कुटुंबीयांसोबत शहरातील विकासकामे व आगामी योजनांच्या संदर्भात चर्चा केली.

श्री. राजेश लोया यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी लोया यांनी अतिशय आत्मीयतेने ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले आणि लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. श्री. दत्ताजी मेघे यांनी देखील निवडणुकीत मोठ्या आघाडीसह विजयासाठी ना. श्री. गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ विधिज्ञ श्री. व्ही.आर. मनोहर यांचे सुपुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांच्यासोबतही ना. श्री. नितीन गडकरी यांनी चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी मंत्री महोदयांचे उत्साहाने स्वागत झाले.

Advertisement