
विशेष ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रेल्वे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत ट्रेनचे स्वागत करण्यात आले. ट्रेन रवाना होताच प्रवाशांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, या विशेष रेल्वे सेवेमुळे विदर्भ आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यटन, व्यापार तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, नागपूर-मडगाव विशेष ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. त्यामुळे नागपूरहून थेट गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक सोयीस्कर आणि उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate




