Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 17 जुलैला विस्तार? शिंदे सेनेला दोन मंत्रीपदांची शक्यता; श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

Advertisement

मुंबई : केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 17 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या विस्तारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे खासदार चार्टर्ड विमानाने आजच दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यमंत्रीपदासाठी नुकतेच शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

राज्यमंत्रीपदासाठी दोन नावांची चर्चा-
ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नावांची राज्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांचेही लक्ष लागले आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर जल्लोषाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

Advertisement

दिल्लीत महत्त्वाच्या बैठका-
आज संध्याकाळी शिवसेनेचे सर्व खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना होणार असून, रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत मंत्रिपद वाटपासह इतर राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत अद्याप संभ्रम-
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. एनडीएमध्ये सहभागी झाल्यापासून पक्षाने राज्यमंत्रीपदाऐवजी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी कायम ठेवली असून, त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews #theft #CrimeBranch

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews #nagpurnews

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate

स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate

नागपुर स्टेशन पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #RailwayNews #NagpurRailwayStation #TrainAccident #news

नागपुर स्टेशन पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #RailwayNews #NagpurRailwayStation #TrainAccident #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges