Published On : Wed, Mar 3rd, 2021

गिट्टी समांतर करण्यासाठी रेल्वेत युनिमॅट

Advertisement

-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कामाला प्रारंभ

नागपुर – कमी वेळात अधिक आणि सुरळीत तसेच सुरक्षित काम व्हायला पाहिजे, या अनुषंगाने भारतीय रेल्वेत युनिमॅट नावाचे भलेमोठे यंत्र आले आहे. रेल्वेइंजिन सारख्या दिसणाèया या यंत्राच्या मदतीने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंना गिट्टी पसरविणे आणि समांतर करण्याचे काम केले जाते.

भारतीय रेल्वेत नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत. रेल्वे मार्गाला मजबुती देण्यासाठी रुळाला चाब्या असतात. यासोबतच दोन्ही बाजूंनी गिट्टी असते. या यंत्राच्या मदतीने रुळाशेजारी गिट्टी पसरविली जाते तसेच ती समांतर केली जाते. गिट्टीमुळे रुळाखालची आणि जवळची जमीन टणक राहते. आधी रेल्वे कर्मचारीच गिट्टी पसरविण्याचे काम करायचे. पण आता देशभरात शेकडो किमी लांबीचे रेल्वे मार्ग तयार होत असल्याने यंत्राची गरज भासायला लागली. भारतीय रेल्वेने युनिमॅट या नावाचे यंत्र तयार केले. या यंत्राच्या मदतीने गिट्टी पसरविणे आणि समांतर करण्यास मदत होते. कमी वेळात अधिक आणि सुरळीत तसेच सुरक्षित काम होत आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर – सेवाग्रामला तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी गती मिळाली आहे. तसेच चिचोंडा या परिसरात तिसरा मार्ग तयार होत आहे. यंत्राच्या साह्याने रुळांशेजारी गिट्टी पसरविण्याचे आणि ती समांतर करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. यासाठी युनिमॅट हे यंत्र सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. काही वेळानंतर हे यंत्र qचचोंडा रेल्वे स्थानक परिसरात म्हणजे तिसरा रेल्वे मार्ग होत असलेल्या ठिकाणी रवाना झाले. इंजिन लागलेल्या यंत्राला विविध भाग आहेत. हे यंत्र तंत्रज्ञांमार्फत चालवले जाते. या मशिनवर एकाच वेळी १९ कर्मचारी काम करतात. विशिष्ट पद्धतीने बनलेल्या या यंत्राने क्षणात गिट्टी समांतर करता येते.